कोल्हापूर: पंचवीस दिवस झाले तरी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा न करणारे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे तर एकदिवस हुकूमशहाच बनतील, असा टोला माजी केंद्रीय गृहमंत्री यांनी कोल्हापुरात लगावला. ( Congress Leader )

वाचा:

ताराबाई पार्क येथील एका रस्त्याला डॉ. वि. ह. वझे यांचे नाव देण्यात आले. या निमित्ताने शिंदे कोल्हापुरात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला देशभर पाठिंबा मिळत आहे. आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. तरीही देशाचा गृहमंत्री आंदोलन गांभीर्याने घेत नाही. त्यांच्याशी चर्चा करत नाही. खरे तर या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी दर दोन तीन दिवसातून एकदा चर्चा करायला हवी होती, मात्र तसे काहीच होताना दिसत नाही. मोदी आणि शहा यांचे हे वागणे असेच सुरू राहिले तर ते एक दिवस निश्चितच हुकूमशहा बनतील, अशी भीती वाटत आहे.’

वाचा:

शेतकरी आंदोलनात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने वातावरण तापवले आहे. देशातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे आता राष्ट्रपतींनी यामध्ये निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, ‘दिल्लीत प्रचंड थंडी आहे. आंदोलकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे यातून तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे.’

यांचे काम अतिशय उत्तम

राज्यात महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम अतिशय उत्तम सुरू असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही पण, किमान समान कार्यक्रम राबवताना ते ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत, ते कौतुकास्पद आहे. पूर्वी सत्तेवर असणारेच भाजप आणि शिवसेना नेते भांडत होते. आता मात्र असे चित्र दिसत नाही. मोदी सरकारने वीजेसह अनेक क्षेत्रात खासगीकरण्यावर भर दिल्याचे सांगून अजून काय काय करतील याचा भरवसा नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर, आनंद माने, संजय डी. पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here