नवी दिल्ली : बीसीसीआयच्या उपाध्यक्षापदासाठी राजीव शुक्ला यांची निवड करण्यात येणार आहे. यापूर्वीही शुक्ला यांनी बीसीसीआयचे काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना बीसीसीआयच्या प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. यावेळी तिन जागांसाठी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयची सर्वसाधारण सभा २४ डिसेंबरला आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी या औपचारीक घोषणा करण्यात येणार आहेत.

उपाध्यक्ष पदाबरोबर बीसीसीआयमधील दोन रीक्त पदे यावेळी भरण्यात येणार आहेत. यावेळी बीसीसीआयच्या काऊन्सिलरपदी ब्रिजेश पटेल आणि एम. खैरुल जमाल मुझुमदार यांची निवड करण्यात येणार आहे. शुक्ला यांनी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. तो अर्ज आज वैध ठरवण्यात आला. त्याचबरोबर या पदासाठी अजून कोणताही अर्ज न आल्यामुळे बिनविरोधपणे शुक्ला यांच्याकडे बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

माहिम वर्मा यांनी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही जागा रिकामी होती. त्यामुळे या पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. त्यावेळी बीसीसीआयकडे उपाध्यक्षपदासाठी राजीव शुक्ला यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांचीच या पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पण बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाभारण सभेत यावर औपचारीक शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here