नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी पक्षाध्यक्ष यांनी शनिवारी पक्ष नेत्यांची एक बैठक बोलावलीय. ज्या वेळेत इतर पक्ष विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत त्यावेळेस काँग्रेसमध्ये मात्र नव्या अध्यक्षाच्या निवडीचं घोंघडं भिजत पडलंय. सोनियांनी बोलावलेल्या या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या निवडीची चर्चा होणार असल्याचं समजतंय. या बैठकीत सोनिया गांधी, तसंच प्रियांका गांधी यांच्यासहीत पक्षातील ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

याच दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते () यांनी शुक्रवारी बोलताना, अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलंय. पक्षाच्या ९९.९ टक्के कार्यकर्त्यांची राहुल गांधी हेच अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, अशी इच्छा असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलंय.

वाचा : वाचा :

लवकरच पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचंही सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. काँग्रेसचं इलेक्टोरल कॉलेज, ऑल इंडिया काँग्रेस समितीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य मिळून योग्य व्यक्तीची निवड पक्षाध्यक्ष म्हणून करतील. राहुल गाधी हेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, ही माझ्यासहीत पक्षातील ९९.९ टक्के लोकांची इच्छा आहे, असंही सुरजेवाला यांनी यावेळी म्हटलं.

आगामी वर्षांत पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू विधानसभा पार पडणार आहेत. त्याअगोदर काँग्रेसला पक्षांतर्गत प्रश्नांवर उत्तरं शोधावी लागणार आहेत. यासाठी काँग्रेसच्या सद्य अध्यक्ष सोनिया गाधी यांनी शनिवारी आपल्या निवासस्थानी पक्ष नेत्यांना बैठकीसाठी पाचारण केलंय.

वाचा : वाचा :

१९ डिसेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीत पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी एकमत तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसंच या बैठकीत शेततकरी आंदोलनावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत सोनिया गांधींना पत्र लिहून आपली नाराजी कळवणाऱ्या पक्षातील ‘नाराज’ नेत्यांनाही उपस्थित राहण्याचा आग्रह करण्यात आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांपैंकी पाच – सहा जण या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

नुकतेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी इच्छा त्यांनी पक्षाध्यक्षांसमोर व्यक्त केली होती. शनिवारी होणाऱ्या बैठकीत कमलनाथ यांना नाराज नेत्यांशी चर्चा दिल्लीत बोलावून घेण्यात आलंय.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here