कोलकाता : शनिवारपासून दोन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी शुक्रवारी-शनिवारी रात्रीच अमित शहा बंगालला पोहचत आहेत.

‘माझ्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी मी आज रात्री कोलकाताला दाखल होणार आहे. मी पश्चिम बंगालमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींशी संवाद साधण्यास उत्सुक आहे’ असं ट्विट अमित शहांच्या ट्विटर हॅन्डलवरून करण्यात आलंय. मुख्य म्हणजे, हे ट्विट बंगाली भाषेतून करण्यात आलंय.

या दौऱ्यात अमित शहा यांनी राज्यातील सात प्रभारींची एक बैठकही आयोजित केलीय. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच भाज अध्यक्ष आणि महसचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.

कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी

बंगालमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केलीय. ढोल-ताशांच्या गजरात भाजपचे अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते अमित शहांचं स्वागत करणार आहेत. गृहमंत्री इथं दाखल होण्याअगोदरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तयारीचा आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कोलकाताला दाखल झाले आहेत.

सुरक्षेत वाढ
नड्डांवरच्या हल्ल्यानंतर अमित शहांच्या दौऱ्यासाठी सुरक्षेत आणखीन वाढ करण्यात आलीय. पूर्वीच्या तुलनेत गृहमंत्र्यांच्या जवळच्या आणि आजुबाजूच्या सुरक्षेसाठी जवानांची संख्या वाढविण्यात आलीय. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेतला मोठी जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलावर असणार आहे. रोड शो आणि जनसभेसाठी हजर होणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. तसंच सामान्य पोशाखात सुरक्षा दलाचे जवान गर्दीत उभे उपस्थित राहणार आहेत. सैन्यासाठी जबाबदार असेल. रोड शो आणि जाहीर सभांमध्ये येणार्‍या लोकांचा सखोल शोध घेतला जाईल. सिव्हिल ड्रेसमध्ये सुरक्षा कर्मचारीही गर्दीत हजर असतील.

TMC चा राजीनामा देणाऱ्या शुभेंदू यांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा

तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. केंद्रीय गृह मंत्रालयानं शुभेंदू अधिकारी यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा प्रदान केलीय. पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू आता बुलेट प्रूफ गाडीतून प्रवास करताना दिसणार आहेत. बंगालच्या बाहेर मात्र त्यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा मिळेल.

‘केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सल्लानंतर करून शुभेंदू यांची सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. शुभेंदू यांना बंगालमध्ये बुलेट प्रूफ वाहनासहीत झेड दर्जाचं सीआरपीएफ संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’ असं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here