जसप्रीत बुमराने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दोनही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर भारतासाठी सर्वात मोठा अडसर होत तो स्मिथचा. बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी भेदक मारा करत स्मिथला चांगलेच जखडून ठेवले होते. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने चेंडू अश्विनच्या हातामध्ये सोपवला. अश्विनने यावेळी स्मिथला चांगलेच चकवले.
अश्विनने स्मिथला कसे चकवले, पाहा…
स्मिथ आता फिरकीपटू अश्विनच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेणार, असे चाहत्यांना वाटत होते. पण त्यावेळी अश्विनने स्मिथला चांगलेच चकवले. अश्विनने यावेळी ऑफ स्पिनचा वापर केलाच नाही. त्याने यावेळी चेंडू ड्रिफ्ट केला. त्यामुळे चेंडू हवेत गेल्यावर थोड्याश्या बाहेरच्या बाजूला गेला. पण जेव्हा चेंडूचा टप्पा पडला तेव्हा तो एकदम सरळ रेषेत गेला. त्यामुळे या चेंडूवर स्मिथ चकला आणि अश्विनने भारताला सर्वात मोलाची विकेट मिळवून दिली.
भारताने ऑस्ट्रेलियाची ४ बाद ६५ अशी अवस्था केली होती. भारताचा फिरकीपटू आर. अश्विन भेदक गोलंदाजी करत होता. त्यावेळी अजून एक विकेट मिळायला हवी, असे भारतीय चाहत्यांना वाटत होते. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कॅमेरुन ग्रीन हा अश्विनची गोलंदाजी सांभाळून खेळत होता आणि त्याच्या समोर फलंदाजी करत असलेल्या मार्नस लाबुशेनला तीन जीवदानं मिळाली होती. पण अश्विनने यावेळी ग्रीनला मोठा फटका मारण्याची एक संधी दिली. त्यावर ग्रीनने मोठा फका मारण्याचा प्रयत्नही केला. हा फटका आत चौकार जाईल, असे वाटत होते. पण त्यावेळी कोहलीने सुपरमॅनसारखी हवेत उडी मारत भन्नाट झेल टिपल्याचे पाहायला मिळाले. कोहलीचा हा झेल चाहत्यांना चांगलाच आवडला. त्याचबरोबर या झेलचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल व्हायला लागला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times