मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज देशातील पेट्रोल आणि जैसे थे आहे. सलग १२ व्या दिवशी स्थिर आहेत. करोना लसीकरण सुरु झाले असून त्याला काही देशामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी कच्च्या तेलामध्ये सध्या तेजी दिसून येत आहे.

आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.

सिंगापूरमध्ये शुक्रवारी बाजार बंद होताना कच्च्या तेलाच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ०.७४ डॉलरने वधारला आणि ४९.१० डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.७६ डॉलरने वधारला असून तो ५२.२६ डॉलर झाला. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटनुसार ११ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात तेल साथ ३.१ दशलक्ष बॅरल आहे.

पुढील वर्षात जागतिक तेलाच्या मागणीत ५.९० दशलक्ष बॅरल प्रतदिन एवढी वाढ होऊन ती ९५.८९ दशलक्ष बॅरल प्रतिदिनपर्यंत जाईल, असा अंदाज ओपेक समूह राष्ट्रांनी वर्तवला. महिनाभरापूर्वी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा हे प्रमाण ३५०,००० बीपीडी ने कमी आहे. क्रूडच्या मागणीचे प्रमाण पुढील वर्षात २००,००० बीपीडीने घसरून २७.२ दशलक्ष बीपीडीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज समूहाने वर्तवला.

एप्रिल महिन्यात साथीच्या उद्रेकामुळे मागणीवर परिणाम झाला, त्यामुळे ऐतिहासिक निचांक गाठल्यानंतर तेलाने सुधारणा दर्शवली. ओपेक+ अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज व सदस्य राष्ट्रांनी निक्रमी उत्पादन कपात केल्याने तेल बाजारात संतुलन राखले गेले. जानेवारी महिन्यात ओेपेक+ समूह पुरवठ्यावरील निर्बंध कमी करणार असून ५००,००० बॅरल प्रतिदिन एवढी पुरवठ्यात भर पडेल. तेल बाजाराला आणखी आधार मिळण्यासाठी ही पुरवठ्यातील वाढ कमी गतीने करण्यात येईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here