मयांक अग्रवाल आणि नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह खेळण्यास आले. बुमराह २ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवाल ९ धावा करून बाद झाला. पहिल्या डावात देखील त्याला धावसंख्या उभा करता आली नाही. मयांक बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १५ अशी होती आणि मैदानावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते.
ही जोडी भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. पम अजिंक्य शून्यावर बाद झाला. त्यानंतर सर्व मदार विराट कोहलीवर होती. पण तो देखील चार धावा करून माघारी परतला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १९ अशी झाली. त्यानंतर वृद्धीमान साहा ४ धावा, तर दुसऱ्याच चेंडूवर अश्विनला जोश हेजलवूडने बाद केले आणि भारताची अवस्था ८ बाद २६ अशी केली.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात भारताची सर्वात कमी धावसंख्या ४२ इतकी आहे. या ४२ धावसंख्येपर्यंत पोहोचायचे असेल तर भारताला अजून मोठी मजल मारावी लागणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times