कालच्या सत्रात डॉ. रेड्डीज लॅब ३.३५ टक्के, बजाज ऑटो २.५० टक्के, इन्फोसिस २.३१ टक्के, विप्रो १.७१ टक्के आणि सिप्ला १.५३ टक्के हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. इंडसइंड बँक ३.१० टक्के, एचडीएफसी बँक २.२८ टक्के, ओएनजीसी १.९७ टक्के, मारुती १.७४ टक्के आणि आयओसी १.३६ टक्के हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.
निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा अनुक्रमे १.५ टक्के व १.३ टक्क्यांनी वधारला. तर निफ्टी एफएमसीजी ०.३ टक्क्यांनी वाढला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.३५ टक्के आणि ०.२४ टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले. देशांतर्गत इक्विटी बाजारात अस्थिर व्यापारी सत्र दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७३.५७ वर बंद झाला.
वाढत्या करोना रुग्णांच्या चिंतेने आशियातील प्रमुख भांडवली बाजारात काही प्रमाणात घसरण झाली. युरोपियन शेअर बाजारात तेजी दिसून आली. एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० कंपनीचे शेअर्स अनुक्रमे ०.१३ टक्के आणि ०.१४ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे ‘निक्केई २२५’ निर्देशांक ०.१६ टक्के व हँगसेंग ०.६७% ने घसरला.
एलअँडटी टेक्नोलॉजी सर्व्हिसेस लि.: एलअँडटी टेक्नोलॉजीचा उल्लेख सीएलएसए या रेटिंग फर्मने खरेदीसाठी केला तसेच तिची टार्गेट किंमत १७५० रुपयांवरून २०२० रुपयांपर्यंत केली. त्यानंतर कंपनीचा शेअर १२.५७ टक्क्यांनी वाढला व २२०९ रुपयांवर बंद झाला.
स्ट्राइड्स फार्मा सायन्स लि. : कंपनीच्या ऑक्झिब्युटीनीन क्लोराइड ५ एमजी टॅबलेटला अमेरिकी एफडीएची मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीचा शेअर केवळ ०.४२ टक्क्यांनी वाढला आणि ७७३.७५ रुपयांवर बंद झाला.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि.: फर्मची १६,००० कोटी रुपयांची बायबॅक ऑफर आज गुंतवणुकदारांसाठी खुली झाल्यानंतर टीसीएस कंपनीचे स्टॉक्स ०.४८ टक्क्यांनी वाढले आणि २८५१.९५ रुपयांवर बंद झाला. ऑफरची फ्लोअर किंमत ३००० रुपये प्रति शेअर एवढी निश्चित झाली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times