नांदेड: ‘संदीप तू तिच्यासोबत बिनधास्त लग्न कर आणि माझ्याकडे ये. मी यथोचित स्वागत करून दोघांनाही जोड आहेर करते व तुला आयुष्यात कधीच मोठ्या बहिणीची कमी जाणवू देणार नाही’, हे आपुलकीचे शब्द संदीप कांबळेंना साखरपु्ड्याच्या दिवशी सारखे आठवत होते. त्या आठवणींनी डोळ्यात अश्रू तरळत होते… आज हव्या होत्या, असं सतत संदीप कांबळेंना वाटत होते. मात्र वैवाहिक जीवनात प्रवेश करत असलेल्या आणि यांना मोठ्या बहिणीसारखं आपुलकीने जवळ घेणाऱ्या शीतल आमटे आता कधीच येणार नव्हत्या.

त्यांचे कारण ही तसेच आहे… मटा ऑनलाइशी बोलतना संदीप कांबळे यांनी मन मोकळे केले… कांबळे हे डीएड शिक्षण संघटनेमध्ये कार्यरत आहेत. त्यांची डॉ. शीतल आमटेंशी काही वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर फोनवर बोलणं व्हायचं. समाजासाठी, विधवा, परितक्त्या महिलांसाठी काहीतरी चांगलं कार्य करण्याची इच्छा होती. याबाबत शीतल आमटेंशी कॉल आणि चॅटिंगवर नेमही संवाद व्हायचा. शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल व्हायला हवे असं त्या सांगायच्या.

करायचे ठरले
नांदेड येथील मुखेड तालुक्यातील बिल्लाई गावात संदीप राहतात. रमाई आनंद कांबळे या तरुणीचा तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला. अडचणी अनेक होत्या. या अडचणींबाबत शीतल आमटेंशी बोलणं व्हायचं. ‘संदीप तू तिच्यासोबत बिनदास लग्न कर आणि माझ्याकडे ये. मी यथोचित स्वागत करून दोघांनाही जोड आहेर करते व तुला आयुष्यात कधीच मोठ्या बहिणीची कमी जाणवू देणार नाही” असा शब्द शीतल आमटे यांनी दिलेला.

संदीप कांबळे सांगतात, साखरपुड्याच्या दिवशी ताईचे हे शब्द कानात गुंजत होते. तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार त्यांनी शीतल आमटेंना बोलून दाखवला होता. त्यांनी या लग्नाला प्रेरणा देऊन संपूर्ण पाठिंबा दिला. ७ फेब्रुवारी रोजी हे जोडपं लग्न करणार आहे. तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला. धुळ्याची मुलगी. दिलेल्या घरी जादूटोण करतात असं सांगत होते. शीतल आमटेंच्या संपर्कात आलोय. स्त्रीयांसाठी काम करू असं सांगत होते. नियोजन झालं होतं. महिलांमना एकत्र घेऊन काम करू. समाजामध्ये कृतिशील काम करायचे आहे. घटस्फोट, वारांगणा, विधवांंसाठी काम करणार होतो. होकार ही दिला होता. स्वत:पासून काम करत होतो. त्यांच्याशी लग्न कर म्हणून सांगायच्या त्या मला.

क्लिक करा आणि वाचा-

संदीप कांबळे म्हणतात खूप रडलो.

संदीप कांबळे म्हणाले, ‘ते सगळं वेदनादायक होतं. मी खूप रडलो. ट्विट केलेलं होते. त्याच मुलीशी आता माझा साखरपुडा झाला आहे. आम्ही तिच्याशी चर्चा करून लग्नाची तारीख काढणार होतो. काल ताई असायला हव्या होत्या. आम्ही ७ फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहोत. त्याच दिवशी लग्न करेन. त्यांच्या साक्षीने आमचं झालं असतं असतं तर फार बरं वाटलं असतं. मोठ्या बहिणीसारखी उभी राहीन, हे त्यांचे शब्द सतत आठवत आहेत. लग्नाला उपस्थित राहीन म्हणाल्या होत्या. छोट्या भावासारखी वागणूक देत होत्या.’

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here