एडिलेड: aus vs ind 1st test भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार ८ विकेटनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी लोटागंण घातल्याने ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी फक्त ९० धावांचे आव्हान होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताची दाणादाण उडवणारे जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सामन्यावर वचर्स्व राखले होते. आज तिसऱ्या दिवशी भारताला चांगली धावसंख्या करून विजय मिळवण्याची संधी होती. पण भारतीय फलंदाजांनी मैदानात फक्त हजेरी लावली. भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये जाण्याची जणू घाई झाली होती.

मयांक अग्रवाल आणि नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह खेळण्यास आले. बुमराह २ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवाल ९ धावा करून बाद झाला. पहिल्या डावात देखील त्याला धावसंख्या उभा करता आली नाही. मयांक बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १५ अशी होती आणि मैदानावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते.

ही जोडी भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. पम अजिंक्य शून्यावर बाद झाला. त्यानंतर सर्व मदार विराट कोहलीवर होती. पण तो देखील चार धावा करून माघारी परतला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १९ अशी झाली. त्यानंतर साहा ४, अश्विन शून्यावर आणि हनुमा विहारी ८ धावांवर माघारी परतले. अखेरच्या जोडीपैकी मोहम्मद शमी १ धावांवर जखमी झाला आणि त्यामुळे भारताचा पहिला डाव ९ बाद ३६ वर जाहीर केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही भारताची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. याआधी भारताने १९७४ इंग्लंड विरुद्ध ४२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताकडून सर्वाधिक ९ धावा मयांक अग्रवालने केल्या. तर हनुमा विहारीने ८ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिंन्सने ४ तर जोश हेजलवुडने ५ विकेट घेतल्या. भारताने पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या डावातील ३६ धाावंसह ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी ९० धावांचे सोप लक्ष्य होते.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठीचे सोपे लक्ष्य सहज पार केले. मॅथ्यू वेडने ३३ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया विजया जवळ पोहोचला असताना मार्नस लाबुशेनला अश्विनने ८ धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डे-नाइट कसोटी मधील हा सलग आठवा विजय ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या सर्व डे-नाइट कसोटीत विजय मिळवला आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीची नाणेफेक जिंकून पराभव झालेली पहिली कसोटी मॅच ठरली आहे.

दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबर पासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळून भारतीय संघाला मालिकेत बरोबर करावी लागेल. या सामन्यापासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मालिका खेळणार नाही. त्यामुळे संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे दिले जाईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here