नाशिक: राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. भुजबळ यांच्या विधानामुळे आगामी निवडणुका आघाडीने लढणार की स्वतंत्रपणे लढणार, हा नवा प्रश्नही उपस्थित झाला आहे. ( )

वाचा:

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. अर्थात तीन पक्षांच्या एकजुटीपुढे भाजपचा टिकाव लागला नाही. सहा पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या पदरी फक्त एक जागा पडली. या निकालांनी भाजपला जबर हादरा बसला असताना आता ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर पालिका निवडणुकांत पुन्हा एकदा राजकीय वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडीतील , काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढून नंतर एकत्र येऊ शकतात असे संकेत दिले.

वाचा:

महापालिका निवडणुकांबाबत विचारले असता, ‘महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्या असे वाटत असले तरी प्रत्यक्ष जागा वाटपात किती तडजोड शक्य होईल, हे आज सांगणे कठीण आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्षाने आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवून नंतरही एकत्र येता येते, असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ यांचे हे विधान पाहता महाविकास आघाडी भाजपला रोखण्यासाठी त्या त्या वेळची स्थिती लक्षात घेऊन व्यूहरचना आखणार, असे संकेत मिळू लागले आहेत.

वाचा:

नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपासून

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा ४ जानेवारीपासून सुरू केल्या जाणार आहेत, असे यावेळी छगन भुजबळ यांनी जाहीर केले. नाशिक शहरातील शाळा सुरू करण्याबाबतही आग्रह होत आहे. परंतु, ठाणे, मुंबई, पुणे शहरात काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष ठेऊन निर्णय घेतला जाईल, असे भुजबळ यांनी केले स्पष्ट.

करोनावरील लस जानेवारी अखेरपर्यंत

कोविड प्रतिबंधक लस देण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात लस येणार आहे. ६०० बुथवरून ही लस दिली जाईल. एका बुथवर दररोज १०० जणांना लस दिली जाईल. त्यामुळे दररोज ६० हजार लोकांना लस मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here