सांगली: ‘राज्य सरकारकडून भटके विमुक्त, अल्पसंख्याक आणि वंचितांवर अन्याय होत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. काँग्रेसच्या नेत्या (Sonia Gandhi ) यांनी मुख्यमंत्री ( Uddhav Thackeray ) यांना पत्र पाठवून वंचितांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. सोनियांच्या पत्राने आमच्या आरोपांना पुष्टी मिळाली. आता तरी काँग्रेसच्या आमदारांनी लाचार न होता सत्तेला लाथ मारून सरकारमधून बाहेर पडावे,’ अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते आमदार ( Gopichand Padalkar ) यांनी काँग्रेसला डिवचत राज्य सरकारवर टीका केली. ते शनिवारी सांगलीत बोलत होते. ( )

वाचा:

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावरून भाजपने महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीकडून राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, भटके आणि वंचितांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. नोकरभरतीत अन्याय होत आहे. बार्टी, आदिवासी संशोधन केंद्रांना तोकडी मदत केली गेली. एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत. सरकारकडून वंचितांना पुरेसा निधी दिला जात नाही. भटक्या विमुक्तांसोबत होत असलेला दुजाभाव काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याही लक्षात आला. यामुळेच सोनिया गांधी यांनी पत्र लिहून राज्य सरकारकडे नाराजी व्यक्त केली. या पत्रामुळे आम्ही करीत असलेल्या आरोपांना पुष्टी मिळाली.’

वाचा:

सरकारच्या ( Maha Vikas Aghadi Government ) किमान समान कार्यक्रमावरही आमदार पडळकरांनी टीका केली. ‘किमान समान कार्यक्रम जनतेला समजून सांगण्यात सरकारला अपयश आले. किमान समान कार्यक्रमावर राज्यात काहीच काम झाले नाही, भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी काम करण्याचा मुद्दा सरकारने किमान समान कार्यक्रमात घेतला, पण याबाबत काहीत काम झाले नाही. यामुळेच सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. आता तरी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी जागे व्हावे. सत्तेसाठी लाचार न होता सत्तेवर लाथ मारून सरकारमधून बाहेर पडावे,’ असे म्हणत त्यांनी काँग्रेसला डिवचले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here