नागपूर: विचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांचे आज दुपारी ३.३० वाजता येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. यांची अंत्ययात्रा रविवार सकाळी ९.३० वाजता त्यांचे विद्याविहार प्रतापनगर येथील निवासस्थान येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील, असे कुटुंबीयांच्यावतीने सांगण्यात आले. ( Update )
मा. गो. वैद्य यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (, सह संयोजक) व मोठा आप्त परिवार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times