याबाबत ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे यांनी सांगितले, की तक्रारदार ज्येष्ठ महिला व त्यांचे पती कोंढवा भागातील साळुंके विहार रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीत राहण्यास आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. महिलेचे पती वयस्कर आहेत. मुलगा हा दुबई येथे असतो. आरोपी महिला ही तीन दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे घरकाम करण्यासाठी आली होती. दोन दिवस काम केल्यानंतर १७ डिसेंबर रोजी सकाळी आरोपी महिलेने तक्ररादार यांना गोड बोलून पिण्याच्या पाहण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्यांचे पाय दाबून देण्याचा बहाणा केला. त्यांना गुंगी आल्यानंतर बेडरूमच्या कपाटातून हिरेजडीत सोन्याचे दागिने, ५० हजारांची रोकड असा सहा लाख २४ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाली. तक्रारदार यांना सकाळी अकराच्या सुमारास गुंगी आली. साधारण दोन वाजण्याच्या सुमारास त्या जाग्या झाल्या. त्यावेळी काम करणारी महिला त्यांना दिसली नाही. तसेच, कपाटातील दागिने, रोकड नव्हती. महिलेने तत्काळ तिच्या मुलीला फोन करून घटनेची माहिती दिली. ती आल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. त्या कामवाली महिलेची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times