एडिलेड: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे त्यांनी चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा १९१ धावांवर ऑल आउट करून ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारताला दुसऱ्या डावात फक्त ३६ धावा करता आल्या. भारताचा दुसरा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. यामुळे भारतीय संघाने अनेक नकोसे विक्रम केलेत.

वाचा-

भारताच्या या डावात एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. टीम इंडियाकडून सर्वाधिक धावसंख्या झाली ती मयांक अग्रवालकडून त्याने ९ धावा केल्या तर त्यापाठोपाठ हनुमा विहारीने ८ धावा केल्या. भारताच्या पहिल्या फलंदाजापासून ते अखेरच्या फलंदाजापर्यंतची धावसंख्या ४,९,२,०,४,०८,४,०,४,१ अशी होती. या कामगिरीवर सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंना प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. काहींनी ही धावसंख्या पाहून भारतीय संघाचा नवा दूरध्वनी क्रमांक आहे की काय असे म्हटले आहे.

वाचा-

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने तर हा OTP नंबर असल्याचे म्हटले…

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. याआधी १९२४ साली दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा ३० धावांवर ऑल आउट झाला होता. तेव्हा आफ्रिकेच्या संघातील सर्वाधिक धावसंख्या ७ इतकी होती. त्या सामन्यात ३० धावांमध्ये ११ धावा या अतिरिक्त धावा होत्या. १९२४ नंतर २०२० साली भारतीय संघाने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी नकोशी कामगिरी केली. भारताला फक्त ३६ धावा करता आल्या आणि मयांक अग्रवालने सर्वाधिक ९ धावा केल्या.

वाचा-

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावातील सर्वात कमी धावसंख्येचा विचार केल्यास १९७४ साली इंग्लंड विरुद्ध भारताचा ४२ धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९७४ साली भारताचा डाव ५८ धावांवर संपुष्ठात आला होता. आज विराट आणि कंपनीने हा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सातव्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या ठरली आहे.

कसोटीमध्ये एका डावात सर्वात कमी धावसंख्या करणारे संघ

२६ धावा न्यूजीलंड विरुद्ध इंग्लंड- १९५५
३० धावा दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड १८९६
३० धावा दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड १९२४
३५ धावा दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड १८९९
३६ धावा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड १९०२
३६ धावा दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९३२
३६ धावा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०२०
३८ धावा आयर्लंड विरुद्ध इंग्लंड २०१९

भारतीय फलंदाजांनी केलेल्या धावा

पृथ्वी शॉ- ०
मयांक्र अग्रवाल- ९
बुमराह- २
पुजारा-०
कोहली-४
रहाणे-०
विहारी-८
साहा-४
अश्विन-०
यादव-४
शमी-१

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here