पालघर: पश्चिम रेल्वे मार्गावरील आणि या रेल्वे स्थानकांदरम्यान ३ मृतदेह आढळले आहेत तर एक मुलगी गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळली असून तिला तातडीने नालासोपारा पूर्वेकडील अलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार दिसत असल्याचे वसई लोहमार्ग पोलिसांनी सागितले. ( )

वाचा:

(वय ३१), नंदा पोपट जंगम (वय ५५), प्रेमिला पोपट जंगम (वय ३५) अशी मृतांची नावे असून समीक्षा फडतरे (वय १०) ही सुदैवाने बचावली आहे. हे सर्व जण पू्र्व येथील साईनाथ नगरातील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये राहणारे होते. या चौघांनीही मालगाडीखाली झोकून दिले. त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर समीक्षा ही गंभीररित्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हे सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाचा:

फिरायला जात असल्याचे सांगून आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हे चौघे घरातून निघाले होते. त्यानंतर पावणेसातच्या सुमारास या सर्वांनी वसई व नालासोपारा स्थानकांदरम्यान मालगाडीखाली झोकून दिले. वसईत उतरून रूळांवरून चौघेही चालत नालासोपाऱ्याच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे. हे पाऊल उचलण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोमनाथ पोपट जंगम यांचा मसाले विक्रीचा व्यवसाय होता इतकीच माहिती हाती आली असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

वाचा:

मुलगी बेशुद्धावस्थेत होती

वसई रेल्वे पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्यता वर्तविली आहे. भरधाव ट्रेनखाली या सर्वांनी उडी घेतली असावी, अशी शक्यता असून दोन मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत होते तर मुलगी बेशुद्धावस्थेत होती, असे पोलिसांनी सांगितले. वसई स्थानकापासून काही अंतरावरच हे मृतदेह आढळले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here