नवी दिल्ली : उद्योगांसाठी पोषक वातावरण आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या ‘इज आॅफ डुईंग’ बिझनेस या क्रमवारी चीनचा क्रमांक घसरला आहे. वर्ल्ड बँकेने २०१८ च्या क्रमवारीत चीनचा क्रमांक ७ अंकांनी कमी केला आहे. या क्रमवारीत भारत १०३ व्या स्थानी आहे. दिवाळखोरी कायद्यातील सुधारणांमुळे भारताने २०१८ मध्ये ‘इज आॅफ डुंइंग’मध्ये ३३ क्रमांकांची झेप घेतली.

वर्ल्ड बँकेने ‘इज आॅफ डुईंग’ बिझनेसची सुधारित क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यात २०१८ मध्ये चीनचा क्रमांक ७ अंकांनी कमी केला आहे.वर्ल्ड बँकेच्या मते २०१८ मध्ये चीनशिवाय सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अजरबैजान या देशांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. ‘इज ऑफ डुईंग’च्या क्रमवारीत अनियमितता आढळून आली होती. त्यांनतर १६ डिसेंबर रोजी वर्ल्ड बँकेने एक निवेदन जारी केले आहे. त्यात चीनसह काही निवडक देशांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे.

वाचा :

वर्ल्ड बँकेने चीनमध्ये उद्योग सुरु करणे, कर्ज मिळवणे आणि कर भरणे यासारख्या घटकांचा अभ्यास करून त्यानुसार चीनची इज ऑफ डुईंग श्रेणीत क्रमवारी निश्चित केली होती. त्यावेळी वर्ल्ड बँकेने चीनला ६५.३ गुण दिले होते. त्यानुसार इज ऑफ डुईंगमध्ये ७८ व्य स्थानी होता. मात्र यातील अनियमितता लक्षात आल्यानंतर वर्ल्ड बँकेने याचा फेर आढावा घेतला. त्यात चीनचे गुण कमी झाले. फेरआढाव्यानंतर चीनचे गुण ६४.५ गुण झाले आहेत. यामुळे चीनचा क्रमांक सात अंकांनी घसरून ८५ झाला आहे. संयुक्त अरब अमिरातचा क्रमांक १६ झाला आहे. सौदी अरबचा क्रमांक ६२ वरून ६३ झाला आहे. अजरबैजानचा क्रमांक ३४ वरून २८ झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here