नवी दिल्ली: कॉंग्रेसमधील कलह आणि नेतृत्त्वावरील पेचाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेत्यांची शनिवारी बैठक ( ) झाली. या बैठकीत कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष ( ), ( ) आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. बैठकीस उपस्थित सर्व नेत्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. या बैठकीत पुन्हा एकदा राहुल गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली. नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. शनिवारपासून सुरू होणारी ही चर्चा आणि बैठकांचा सिलसिला पुढील १० दहा दिवस चालेल आणि सोनिया गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतील, असं कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी सांगितलं होतं.

काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी आज १० जनपथ येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, बीएस हुड्डा, अंबिका सोनी आणि पी. चिदम्बरम हे उपस्थित होते.

सोनिया गांधीसोबत वरिष्ठ नेत्यांची बैठक ५ तासांहून अधिक वेळ चालली. या बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली मतं मांडलं. या बैठकीत राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली. पक्ष जी काही जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास तयार आहे, असं बैठकीच्या अखेरीस राहुल गांधी म्हणाले. यानंतर बैठकीत टाळ्यांचा कडकडाट झाला.

पक्षाच्या पुढील रणनितीवर चर्चा झाली. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यास बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा केली, अशी माहिती कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर दिली.

गेल्या २३ ऑगस्टला कॉंग्रेस अध्यक्षांना वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रात २३ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. यामुद्द्यावर पाच किंवा सहा नेत्यांचा मुख्य गट सोनिया गांधींना भेटून आपली चिंता मांडतील, अशी शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेसच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. बंडखोरीनंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसची सत्ता गेली. बंडखोरीच्या सतत धोक्यांमुळे राजस्थानमध्ये पक्षाला सत्ता राखण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

बिहारच्या निवडणूकीत कॉंग्रेसने खराब कामगिरी केली आणि केरळ आणि राजस्थानसारख्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतांचा फटका बसला.

कित्येक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना पुन्हा पक्षाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. पण राहुल गांधींच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही, असं त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितलं. राहुल गांधी अजूनही सर्व निर्णय घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरील हल्ल्यांवर पक्षाचा ते चेहरा आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here