अॅडलेड : : भारतीय संघाचा आज लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवाबरोबरच भारतीय संघाला मोहम्मद शमीच्या रुपात मोठा धक्का बसला. शमीच्या दुखापतीबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक अपडेट दिली आहे, त्यानुसार भारतीय संघाला वाईट बातमी मिळू शकते, असे वाटत आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शमीच्या हातावर एक बाऊन्सर आदळला होता. यावेळी शमीला फलंदाजी करायची होती, पण हे दुखणे एवढे भयंकर होते की, त्याला मैदान सोडून जावे लागले.

शमीच्या दुखापतीबाबत कोहली म्हणाला की, ” दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना शमीला दुखापत झाली आहे. शमीची ही दुखापत गंभीर असल्याचे दिसत आहे, कारण त्याला आपला हात उचलताही येत नाहीए. त्याचबरोबर शमीला यावेळी जास्त दुखत आहे. पण शमी हा वैद्यकीय चाचणीसाठी जाणार आहे आणि त्यानंतर जो अहवाल येईल, तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट होऊ शकेल.”

भारतीय संघाला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या रुपात यावेळी मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. कारण शमीला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच जायबंदी निवृत्त होऊन शमीला पेव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. २१ व्या षटकातील पॅट कमिन्सने दुसरा चेंडू बाऊन्सर टाकला होता. हा चेंडू शमी चुकवायला गेला. पण त्यावेळी हा चेंडू शमीच्या उजव्या हातावर आदळल्याचे पाहायला मिळाले.

शमीला जेव्हा दुखापत झाली तेव्हा भारताच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली आणि त्याच्यावर उपचार केले. कारण त्यावेळी शमीने फलंदाजी करणे महत्वाचे होते. कारण भारतीय संघासाठी प्रत्येक धाव महत्वाची होती. शमीलाही यावेळी खेळायचे होते. पण शमीला झालेली दुखापत एवढी गंभीर होती की, त्याचे दुखणे थांबतच नव्हते. त्यामुळे अखेर शमीला मैदान सोडावे लागले. त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे. कारण शमीची दुखापत गंभीर असली आणि तो खेळू शकला नाही, तर भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे आता शमीच्या दुखापतीचा वैद्यकीय अहवाल आल्यावर, ही गोष्ट स्पष्ट होऊ शकेल.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार ८ विकेटनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी लोटागंण घातल्याने ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी फक्त ९० धावांचे आव्हान होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताची दाणादाण उडवणारे जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here