मुंबई प्रदेश समितीच्या अध्यक्षपदी अशोक उर्फ भाई जगताप यांची निवड करण्यात येत असल्याचे काँग्रेस नेतृत्वाकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबई पालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काँग्रेस मराठा नेते भाई जगताप यांना मुंबईत पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी , यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यात भाई जगताप यांच्यावर हायकमांडने विश्वास टाकला आहे.
भाई जगताप यांच्या गाठीशी दांडगा अनुभव आहे. पक्षातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times