कोलकाता: तृणमूल कॉंग्रेसचे दिग्गज नेते सुवेंदु अधिकारी ( ) यांनी शनिवारी मिदनापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते ( ) यांच्या उपस्थित एका जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. शहा यांनी सुवेंदू अधिकारी यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ( ) यांच्यावर हल्लाबोल केला. ‘इतके नेते तृणमूल काँग्रेसला का सोडत आहेत? कारण गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि ममतांची घरणेशाही यामागे आहे. ममतादीदी ही तर सुरवात आहे. निवडणुका येईपर्यंत तुम्ही एकट्या असला’, असा इशारा अमित शहांनी दिला.

सुवेंदु अधिकारी यांनी २७ नोव्हेंबरला ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यांनी १६ डिसेंबरला TMC सोडण्याची घोषणा केली होती. चक्रीवादळ अफानपेक्षाही राज्यात मोठे वादळ येईल आणि त्यात ममता बॅनर्जींचे सरकार उडून जाईल, असा दावा सुवेंदु अधिकारी यांच्या साथीदारांनी केला आहे. करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांना आपल्याला फोन करण्याची इच्छा होती. पण त्यांना रोखण्यात आलं, असं सांगत सुवेंदु अधिकारी यांनी थेट ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला. आपल्याला अमित शहा यांनी दोनदा फोन केला. मुकुल रॉयही आपल्याशी बोलले. तृणमूल कॉंग्रेस सोडणाऱ्या अर्जुन सिंहांवर १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. माझा भाऊ मनीष शुक्ला याची हत्या केली गेली, असा गंभीर अरोप सुवेंदु अधिकारी यांनी केला.

‘निवडणुकीच्या निकालात भाजप प्रथम क्रमांकावर असेल’

बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलऐवजी भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल. मी माझ्या आईचा विश्वासघात केला आहे, असा आरोप होतोय. माझी आई गायत्री देवी आहे आणि तिचं स्थान इतर कोणीही घेऊ शकत नाही. दुसरी, माझी भारत माता आहे, असं सुवेंदु अधिकारी म्हणाले.

‘ममतांनी संकुचित राजकारण’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेशवादावरून ममतादीदींवर जोरदार टीका केली. बंगालमध्ये संकुचित राजकारण सुरू आहे. पण बंगालला खुदीराम बोसवर यांच्यावर जेवढा अभिमान आहे तितकाच अभिमान संपूर्ण देशालाही आहे. जे लोक प्रदेशाचं राजकारण करत आहेत त्यांनी आता ते थांबवावं. १९०८ मध्ये खुदीराम बोस यांना ब्रिटीस फाशी देत होते त्यावेळी त्यांनी ‘वंदे मातरम्’ ची घोषणा देऊन देशातील तरुणांना प्रेरणा दिली होती, असं अमित शहा म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here