सुनील दिवाण । पंढरपूर

जालन्यापासून करमाळ्यापर्यंत दहशत पसरवणारा अखेर शुक्रवारी मारला गेला. वनविभागाच्या पथकांना जो बिबट्या सतत गुंगारा देत होता त्या बिबट्याचा अचूक वेध घेण्याचे काम टीम बारामतीच्या शार्प शूटरने करून दाखवले व या बिबट्याची दहशत कायमची संपवली. नरभक्षक बिबट्या मारला गेल्याने एक नव्हे तर नगर, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे… ( Latest Update )

वाचा:

टीम बारामतीचे यांनी ‘ ऑपरेशन बिबट्या’ कसे यशस्वी झाले ते सांगितले. हा सारा अनुभव काळजाचा थरकाप उडवणारा आहे. डॉ. धवलसिंह म्हणाले… सतत चार दिवसांपासून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न करत होती. यांना काल हा नरभक्षक बिबट्या वांगी परिसरात दिसल्याचे समजताच रिस्क घेत पहाटेपासूनच सर्व केळीच्या बागा शोधायला सुरुवात केली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास हा बिबट्या राखुंडे वस्तीजवळील एका केळीच्या बागेत दिसल्याची पक्की खबर मिळाली व टीम बारामतीचे तावरे, मी स्वत: व वन विभागाचे अधिकारी संजय कडू आम्ही या केळीच्या बागेला चारही बाजूंनी वेढले. मात्र, बिबट्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हती व दिवसही मावळायला लागल्याने तावरे यांनी मला जीपच्या टपावर बसून केळीबागेत घुसण्याच्या सूचना दिल्या आणि इतर बाजूंनी बाकीच्यां शूटर्सनी पोजिशन घेतली. जीप हळूहळू केळीच्या बागेत पुढे जात असताना अंधार वाढू लागल्याने बिबट्याचा शोध घेणे अधिक धोक्याचे झाले होते.

वाचा:

धवलसिंह बोलत होते… केळीच्या बागेत एका टप्प्यावर गेल्यानंतर अचानक काही अंतरावरच बिबट्या दिसला आणि मी सावध झालो. बिबट्या बिथरलेला असल्याने तो हल्ला करणार हे निश्चित होते. झालेही तसेच. त्याने हल्ला करण्यासाठी जीपच्या दिशेने धाव घेतली. तो क्षण असा होता की, थोडा जरी विचलित झालो असतो तरी आज बिबट्या ऐवजी आपला शेवट होणार याची पूर्ण कल्पना मला होती. मी क्षणार्धात नेम धरून बिबट्यावर गोळी झाडली. पहिली गोळी थेट बिबट्याच्या डोक्याला लागली. तरीही तो पुन्हा उठून हल्ल्यासाठी माझ्या दिशेने येऊ लागला. त्याचवेळी मी दुसरी गोळी झाडत त्याच्या छातीचा वेध घेतला आणि त्याची हालचाल मंदावली. त्यानंतर कोणताही धोका पत्करायचा नाही म्हणून मी तिसरी गोळी झाडली आणि बिबट्याला ठार मारल्याचा इशारा केला. त्यानंतर सर्व शूटर्स व वन विभागाची टीम घटनास्थळी आली. बिबट्या मारला गेल्याचे पक्के झाल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. हा सर्व घटनाक्रम सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांपासून ते सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत चालला. केवळ पंधरा फुटांवरून फायर केल्याने अंधूक प्रकाशातही योग्य जागी निशाणा लागला.

वाचा:

बिबट्या पुन्हा निसटला असता तर…

‘ टीम बारामती ‘चे नेतृत्व करणारे हर्षवर्धन तावरे यांनीही या मोहिमेबद्दल माहिती दिली. ‘काल आमचे अतिशय सूक्ष्म नियोजन झाले होते. बिबट्याला जायबंदी करायचेच असे आम्ही ठरवले होते. बिबट्या पुन्हा निसटला तर एखादी दुर्घटना होण्याची भीती होती. बिबट्या ज्या पद्धतीने वांगी परिसरातील मानवी वस्तीजवळ पोचला होता त्यावरून त्याने नक्कीच हल्ला केला असता. त्यामुळे त्याला जायबंदी करणे एवढे एकच ध्येय ठेवून आमच्या टीमचे प्रयत्न सुरू होते’, असे तावरे यांनी सांगितले. यापूर्वी दोन वेळा फायर करून बिबट्या सुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आणताच ते फायर आम्ही केले नव्हते, असे ते म्हणाले. आम्ही खात्री झाल्याशिवाय कधीच फायर करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक मानवी रक्ताची चटक लागलेला हा नरभक्षक बिबट्या दोन वेळा वनविभागाच्या ट्रॅपमधून सुटल्याने परिसरातील ग्रामस्थ संतप्त होते आणि त्यातूनच टीम बारामतीची नेमणूक करण्यात आली होती. काल या बिबट्याची दहशत संपवून टीम बारामतीचे हर्षवर्धन तावरे व त्यांचे सर्व सहकारी रात्री उशिरा अकलूज येथे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी पोहचले. तिथे इतक्या रात्रीही करमाळा व अकलूज परिसरातील ग्रामस्थ या टीमचे अभिनंदन करण्यासाठी पोहचले होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here