म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे ( ) कुर्ला येथील तरूणांच्या अंगलट आले आहे. तलवारीने केक कापतानाचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली.

कुर्ला नेहरू नगर बस डेपो परिसरातील राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या समीरउद्दिन जमीरउद्दिन अन्सारी (वय २०) याचा शनिवारी वाढदिवस होता. शुक्रवारी मध्यरात्री समीरउद्दीन याच्या मित्रांनी केक आणला आणि घराजवळच तो तलवारीने कापण्यात आला. केक कापतानाचा व्हीडीओ शनिवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. तलवारी बरोबरच करोनाबाबत कोणतेच नियम पाळले गेले नसल्याचे व्हीडीओतून दिसले. सामाजिक अंतर न पाळता, मास्क न बांधता हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याने नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा व्हीडीओ राजीव गांधी नगरमधील असल्याचे कळताच पोलिसांनी समीरउद्दिन यांच्यासह मोहंमद असिफ समीउल्हा इद्रिसी (१९) तौफिक रफिक शेख (२२), अरबाज आयुब शेख( २३), मिसम अब्बास आश्रफ हुसेन सय्यद( १९), अमान तन्वीर शेख(१९) आणि एक अल्पवयीन तरूण आशा एकूण सात जणांना अटक केली. पोलिसांनी केक कापण्यासाठी वापरलेली तलवार हस्तगत केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here