सिंधुदुर्गः गेली अनेक वर्षे रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारी रोजी चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.

यासंदर्भात ते पुढे म्हणाले की,’राज्य सरकारने चिपी विमानतळाचे उद्घाटन प्रजासत्ताकदिनी करण्याचे निश्चित केले आहे. चिपी विमानतळ कार्यान्वित करण्याच्या संदर्भात समितीच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकारच्या अधिका-यांसमवेत या प्रकल्पाचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यानंतर उद्घाटनाची तारीख ठरविण्यात आली. त्यानुसार नागरी उड्डाण मंत्रालयाने नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआर) यांना आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी तसेच विमानतळ परवानाधारक असलेल्या आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विमानतळ विकासक यांना सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत.’

‘नागरी उड्डाण मंत्रालयाने आरसीएस उड्डाण योजनेंतर्गत मुंबई-सिंधुदुर्ग मार्गवाटप करण्यात आलेल्या अॅलियंस एअरलाही आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उद्घाटन उड्डाणासंबंधीचे वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्र नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदीपसिंग खरोला यांनी आपल्याला दिले आहे,’ असेही खा. विनायक राऊत यांनी सांगितले.

भाजप-शिवसेना युती सरकार असताना तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सप्टेबर २०१८ मध्ये मुंबईहून विमानाने गणेशमूर्ती आणून चिपी विमानतळाची चाचणी केली होती. मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू झाली नाही. त्यामुळे सिंधुदुर्गवासीय आणि चाकरमान्यांची निराशा झाली होती. त्यानंर मार्च २०१९ मध्येही सुरेश प्रभू, देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते. पण विमानसेवा मात्र सुरू होऊ शकली नाही.आता मात्र २६ जानेवारीला उद्घाटन होणारच अशी ग्वाही खा.विनायक राऊत यांनी दिली.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here