म. टा. प्रतिनिधी, नगर:‘राज्यात महाविकास आघाडीत ( maha vikas aghadi ) सहभागी होताना काँग्रेसने ( congress ) लाचारी पत्कारली होती. किमान समान कार्यक्रम असल्याचे दाखवत काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाची दिशाभूल केली आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना ( sonia gandhi letter to uddhav thackeray ) लिहिलेल्या पत्रावरून हेच स्पष्ट होते,’ असा टोला माजी मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये ठरल्याप्रमाणे किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंबंधी गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यासंबंधी बोलताना विखे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विखे म्हणाले, ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा फक्त सत्ता वाटपाचा कार्यक्रम होता. यामध्ये कुठेही किमान समान कार्यक्रम नव्हता. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करुन सत्तेरसाठी लाचारी पत्करल्याचेच आता समोर आले आहे. आतापर्यंतच्या कळात जनतेला महाविकास आघाडी सरकारचा फक्त सत्ता वाटपाचा कार्यक्रम पहायला मिळाला. यांचा समान कार्यक्रम कुठे दिसलाच नाही. हेच काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या पत्रावरून उघड झाले आहे. राज्या तील काँग्रेसच्या नेत्यां नी सत्तेजसाठी लाचारी पत्कारुन केंद्रीय नेत्यांृची कशी फसवणूक केली हेच यातून स्पवष्टल होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्याे किमान समान कार्यक्रमानुसार ग्रामीण भागातील दलित, वंचित, मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावण्या चा कोणताही कार्यक्रम दिसला नाही. एक वर्षाच्याा कार्यकाळात या सरकारने फक्ति घोषणा केल्याह. खोटी आश्वा्सने दिली. आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाच्यार केंद्रीय नेतृत्वातला राज्याशच्याे मुख्य,मंत्र्यांना पत्र पाठवून याबाबतची व्याक्तज करावी लागलेली खंत पुरेशी बोलकी आहे. भविष्या्त याचे पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाहीत.’

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘या निवडणुका पक्षीय स्तारावर होत नसल्याम तरी गावपातळीवर कार्यकर्ते या निवडणुकीत सक्रीयतेने सहभागी होतील. संकटात सापडलेल्याड शेतक-यांना महाविकास आघाडी सरकारकडून न मिळालेली मदत आणि करोनाच्या संकटात राज्याेतील जनतेचे झालेले हाल लक्षात घेतले तर महाविकास आघाडी सरकारच्याा विरोधातील प्रतिक्रिया या निवडणुकीतून राज्या्त व्यीक्ते होतील आणि भाजपाला जनाधार मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here