म. टा. प्रतिनिधी, हडपसरः कोणताही आजार नसताना वेगवेगळे आजार झाल्याचे सांगून एका महिलेला हिपनॉटाइज द्वारे आजारावर उपचार करायचे सांगून वेळोवेळो तब्बल एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे उकळण्याचा प्रकार मागील सहा महिन्यापासून होत होता. महिलेकडील पैसे संपल्यानंतर पतीला सात लाख रुपये मागितलेल्या नंतर पतीने एवढे पैसे कशाला लागतात असे विचारणा केल्यानंतर सदर प्रकार उघड झाला. याप्रकरणी रुग्णाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून डॉक्टर वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विद्या धनंजय गोंद्रस , ( वय रा . कोंडाई मारुती बिल्डींग, साळुखे विहार रोड , माय फेअर इलेगंझा फेस -२ , वानवडी पुणे ), सुषमा सुभाष जाधव ( वय ५८ रा. वडगांव बुद्रुक ता.हवेली , जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times