मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायदा (), राष्ट्रीय नागरिक नोंदणी () व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीनं आज, शुक्रवारी ची घोषणा केली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे.

लाइव्ह अपडेट्स:

>> ठाण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको, रस्त्यावर झोपून आंदोलन

>> मुंबई: सायन-ट्रॉम्बे रोडवर रास्ता रोको

>> मुंबई: बंदला चेंबूरमध्ये हिंसक वळण, बसवर दगडफेक

>> मुंबई: घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरात मोठा पोलीस बंदोबस्त, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न

>> लोकांपर्यंत जे पोहोचवायचंय, ते पोहोचलंय असं मला वाटतं – प्रकाश आंबेडकर

>> बंदला प्रतिसाद मिळत असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा.

>> मनमाडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद

>> मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात अद्याप बंदचा परिणाम नाही, दैनंदिन जीवन सुरळीत

>> शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्याची ‘वंचित’ची विनंती

>> बंद दरम्यान शांतता राखण्याचं प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

>> बंदला ३५ सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिल्याचा ‘वंचित’चा दावा

>> बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त

>> सीएए, एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र बंद

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here