अलवर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रात्री एका हॉटेलमधील खोली भाड्याने घेतली. त्याच हॉटेलमधील दोन महिला कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून महिलांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली.
हत्येसाठी २० लाखांची घेतली होती सुपारी
अलवर जिल्ह्यातील पोलिसांनी एका हत्या प्रकरणातील आरोपी नरेश उर्फ नेहरू याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. आरोपींनी द्वारकाधीश सोसायटीचे चेअरमन धर्मेंद्र जाट यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. त्यासाठी त्यांनी २० लाख रुपये घेतले होते. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन विदेशी पिस्तुल, एक देशी कट्टा आणि १२ काडतुसे जप्त केली आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times