एडिलेड: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. दुसऱ्या डावात भारताने फक्त ३६ धावा करून भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्येची नोंद केली. यजमान ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला एडिलेड कसोटीत पराभव पाठोपाठ आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

दुसऱ्या डावात भारताची अखेरची जोडी मैदानावर असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंन्सचा चेंडू मोहम्मद शमीच्या हाताला लागला. त्यामुळे शमीला मैदान सोडावे लागले आणि भारताने ९ बाद ३६ वर डाव घोषीत केला. शमी दुसऱ्या डावात गोलंदाजीला देखील येऊ शकला नाही. वैद्यकीय तपासणीत त्याच्या मनगटाला फॅक्टर झाल्याचे आढळले. यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरीत कसोटी मालिकेत शमी खेळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. शमीच्या जागी भारतीय संघात किंवा नवदीप सैनी या पैकी एकाला संधी मिळू शकते.

वाचा-

कसोटी क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव या धक्क्यातून सावरण्याआधीच टीम इंडियाला शमीच्या फॅक्चरची बातमी कळाली. मैदानातून बाहेर आल्यावर शमीला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे फॅक्चर झाल्याचे समजले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीच्या हाताला फॅक्चर आहे आणि कसोटी मालिकेतील उर्वरीत सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे.

वाचा-

शमीच्या जागी भारतीय संघात मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे. दोन सराव सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. मेलबर्न मैदानावर होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात तो पदार्पण करू शकतो. भारताचा कर्णधार विराट कोहली देखील पुढील सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. तो बाप होणार असून त्यासाठी भारतात येणार आहे. विराट नसल्याने त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून कोणाला घ्यायचे असा प्रश्न पडलेला असताना आता शमीच्या फॅक्चरमुळे भारतीय गोलंदाजीची धार कमी होईल की काय अशी काळजी वाटू लागली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here