मुंबईः ‘कांजूरमार्गची जमीन ही केंद्राची असेल नसेल हा वाद आपण सोडवू शकतो. केंद्रानं आणि राज्यानं मिळून चर्चेदरम्यान हा वाद सोडवला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री यांनी विरोधकांना केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसोबत संवाद साधला. यावेळी राज्यातील करोनाची परिस्थिती, नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचना तसंच, सध्या वादात सापडलेल्या कांजूरमार्गच्या मेट्रो ३ कारशेडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. याचवेळी मेट्रो कारशेडवरून सरकारला वेळोवेळी लक्ष्य करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं आहे.

‘कांजूर मेट्रो कारशेडचा वाद चालला आहे तो जनतेच्या हिताचा नाहीये. माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. चर्चेदरम्यान कांजूर मेट्रो कारशेशेडचा हा प्रश्न सोडवू शकतो. हा माझ्या अहंकाराचा प्रश्न नाहीये तुमच्याही नसला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

‘मी अहंकारी आहे माझ्या महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी आहे. आरे कारशेड आपण मुंबई मेट्रो ३ची करणार होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेत घनदाट जंगल होतं. उर्वरित २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्याया जंगल मारत मारत ही जागा वाढवावी लागली असती. म्हणूनच कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता,’ अशी माहिती मु्ख्यमंत्र्यांनी दिली आहे.

‘कांजूरमार्गला ४० हेक्टर जागा सरकारला मिळाली होती. ती जागा ओसाड आहे, कांजूरमार्गला मेट्रोच्या ३, ४ आणि ६ मार्गिकेच्या कारशेड करण्यात येणार होत्या. जिथे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होती तिकडे अन्य लाइनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ मेट्रोच्या एका लाइनसाठी आरेमध्ये कारशेड का?’, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here