‘युरोप, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पाश्चिमात्य देशांत करोना विषाणूचं स्वरुप बदललं आहे. हा नवा विषाणू करोनापेक्षा अधिक वेगानं पसरू शकेल हीच तिथं भीती आहे. आता नवीन वर्षाच्या दरम्यान पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू करणार का असे अनेक प्रश्न मला विचारण्यात येत आहेत. पण मला नाही वाटत राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी व लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे. आपण अनेक गोष्टी आता अनुभवातून शिकतोय,’ असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे.
‘राज्यात आता सर्व हळूहळू अनलॉक होत आहे. मात्र, तरीही कुटुंबप्रमुख म्हणून सावध राहा सांगण हे माझं कर्तव्य आहे. आता हिवाळा सुरु झाला आहे. थंडीचे आजार आता वाढताना दिसत आहे. साथीचे आजार होऊ नये यासाठी हात धुणे, मास्क लावणे आणि अंतर राखणे हीच त्रिसुत्री आहे. लस येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत मास्क लावणं अनिवार्य आहे. कमीत कमी सहा महिने मास्क वापरणं बंधनकारक आहे,’ असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘राज्यातील ७५ टक्के लोकं मास्क वापरत आहेत परंतु उर्वरित लोकं मात्र ही बंधन पाळत नाहीत. अशा लोकांमुळं कुटुंबांनाही धोका निर्माण होतो. त्यामुळं इलाजापेक्षा आपण काळजी घेतलेली बरी,’ असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times