बॉलिवूडमधला सर्वात पॉप्युलर स्टारकिड कोणी असेल तर तो तैमूर. त्यामुळं त्याच्यामागं माध्यमांचा विशेषत: फोटोग्राफर्सचा गराडा असतो. सोशल मीडियावरही तैमूरचे अनेक फॅन पेजेस आहेत. असं असताना करिनासाठी तो किती खास असेल हे तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून दिसून येत आहे.
‘तुझ्या अम्माशिवाय तुझ्यावर कोणीच जास्त प्रेम करू शकत नाही, असं म्हणत करिनानं तिच्या तैमूरबद्दलच्या भावना शेअर केल्या आहेत.
माझ्या मुला.. वयाच्या चौथ्याच वर्षी तुझ्याकडं असलेला दृढनिश्चय, आत्मसमर्पण आणि लक्ष केंद्रीत करण्याची वृत्ती हे सर्व पाहून मला खूप आनंद होतोय. तुझ्या प्रयत्नांसोबतच तुला देवाचे अनेक आशीर्वाद मिळो. तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करणं कधीही सोडू नको.बर्फवृष्टीत, फुलांसोबत खेळणं, इकडं तिकडं बागडणं असो, बर्थडेला संपूर्ण केक खा…तुला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला कधीही विसरू नकोस आणि तुझ्या अम्माशिवाय या जगाज तुला कोणीही जास्त प्रेम करू करू शकत नाही. हॅपी बर्थडे टिम…असं म्हणत करिनानं खास पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, करिनाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आमिर खानही आहे. याशिवाय करण जोहरच्या मल्टीस्टारर ‘तख्त’ सिनेमावरही ती सध्या काम करत आहे. यात अनिल कपूर, विक्की कौशल, रणवीर सिंग, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times