चिलीचे राष्ट्रपती सॅबेस्टीयन पिनेरा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. अखेर मास्कचा वापर न केल्याबद्दल राष्ट्रपतींनी माफी मागितली. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती पिनेरा यांनी जवळपास ३५०० डॉलरचा (दोन लाख ५७ रुपये) दंड वसूल करण्यात आला.
वाचा:
राष्ट्रपती पिनेरा यांनी सांगितले की, आपल्या घराबाहेर असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना एका महिलेने सेल्फी काढण्याची विनंती केली. तिच्या विनंतीनंतर सेल्फी काढला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, फोटोमध्ये राष्ट्रपती पिनेरा आणि महिला हे दोघेही मास्कशिवाय असल्याचे दिसून आले. त्यानुसार राष्ट्रपतींना दंड ठोठावण्यात आला.
वाचा:
चिलीमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. चिलीत पाच लाख ८१ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, १६ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तिला दंड अथवा कारावासाची शिक्षा अशी कारवाई करण्यात येत आहे. चिलीचे राष्ट्रपती मागील वर्षीदेखील एका पिझ्झा पार्टीमुळे वादात अडकले होते. न्यूझीलंडमध्येही काही महिन्यांपूर्वी लॉकडाउनच्या काळात एका मंत्र्यावर कारवाई करण्यात आली होती. लॉकडाउनमध्ये हे मंत्री समुद्र किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेत होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times