सांगली: “मला तुमचा फोटो काढायचाय” असं एका लहानग्याचं वाक्य कानी पडताच मंत्री यांनी त्या लहानग्याला तात्काळ पोझ दिली आणि ‘नीट काढलास ना रे फोटो’ असं म्हणून त्याचे कौतुक करत त्याच्या या धाडसाला शाबासकीही दिली आहे. जयंत पाटील वाळवा येथील नवेखेड येथे दौर्यावर असताना हा किस्सा घडलाय.
जेव्हा मंत्री आणि त्यांचा ताफा गावागावात फिरत असतो त्यावेळी लहानग्यांचा तो कुतुहलाचा विषय असतो. त्या कुतुहलातूनच एका लहानग्याने मंत्री जयंत पाटील यांचा काढलेला फोटो सध्या सांगलीत एक कौतुकाचा विषय ठरला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे मंत्री जयंत पाटील यांचा दौरा होता. यावेळी ६ वर्षाचा रुद्र सागर जंगम या लहानग्याने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा आग्रह धरला आणि जयंत पाटील यांनी लगेचच लहानग्याचा हट्ट पुरवला.
लहानग्याला पोझ दिल्यानंतर त्याचे तोंडभरून कौतुकही केले. विशेष म्हणजे रुद्रने तोंडपाठ असलेल्या मंगलाष्टकाही जयंत पाटील यांना ऐकवून दाखवल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times