लक्ष्मी लक्ष्मण भुरला (३८) असे या मृत महिलेचे नाव असून, ती मुलासह भिवंडीतील हाफसन आळीमध्ये राहात होती. सकाळी मुलगा कामावरून आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. मुलाने दरवाजा तोडल्यानंतर लक्ष्मी घरात मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मीची हत्या शनिवारी सकाळी ६.३० पूर्वी झाली असून हल्लेखोरांनी तिच्यावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. या हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी कोण होते, तसेच हत्येचे कारण समजू शकले नाही.
लवकरच आरोपींना अटक करणार
अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. परंतु लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. या महिलेसोबत तिचा मुलगा राहतो. संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत तो घरी नव्हता. मात्र, या महिलेच्या संपर्कात कोण-कोण आहेत. याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times