नागरिकत्व सुधारणा कायदा (), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) व केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात ‘वंचित’नं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. वंचितचं प्रभावक्षेत्र असलेल्या अकोल्यात बंदला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अकोल्यातील मुख्य बाजारपेठ बंद आहे. मुंबई, औरंगाबाद व नाशिकमध्ये सकाळपासूनच ‘वंचित’चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. औरंगाबादेत काही भागात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवणंच पसंत केलं आहे. तर, मुंबईत अनेक ठिकाणी रास्ता रोको सुरू आहेत. चेंबूरमध्ये बेस्टच्या बसवर दगडफेक झाली असून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
वाचा:
या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्हाला जे सांगायचं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलंय असं आम्हाला वाटतं. माझ्या माहितीनुसार अनेक ठिकाणी दुकानं उघडलेली नाहीत. आजचा बंद शांततेत व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. हिंसाचार होणार नाही. हिंसाचार करणारे वंचितचे कार्यकर्ते नाहीत, असंही त्यांनी निक्षून सांगितलं. ३५ सामाजिक संघटनांचा बंदला पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times