बोस्टन: संसर्गामुळे मृत्यू येण्याचा धोका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक आहे. समान वय आणि समान आरोग्याच्या स्थितीच्या तुलनेत पुरुषांना हा धोका ३० टक्के अधिक असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. ‘क्लिनिकल इन्फेक्शसस डिजीजेस’ नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

या संशोधनात अमेरिकेतील युनिर्व्हसिटी ऑफ मॅरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनमधील शास्त्रज्ञांनी देशभरातील ६१३ रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-१९ च्या जवळपास ६७ हजार रुग्णांचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार, याआधीच लठ्ठपणा, उच्च रक्तदाब अथवा मधुमेहासारख्या आजाराशी दोन हात करत असलेल्या कोविड-१९ ने संसर्गबाधित झालेल्या २० ते ३९ या वयोगटातील रुग्णांना आपल्या वयाच्या इतर बाधितांच्या तुलनेत मृत्यू येण्याचा अधिक धोका आहे. संशोधनातील माहितीमुळे संसर्गबाधितांच्या उपचारात मदत मिळू शकते, असे या संशोधनाचे लेखक अँथोनी डी हॅरीस यांनी सांगितले.

वाचा:

जगभरात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात करोनाबाधितांची संख्या सात कोटी ६७ लाखांहून अधिक झाली आहे. तर, मृतांची संख्य १७ लाखाच्या घरात पोहचली आहे. आतापर्यंत करोनाबाधितांचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत.

वाचा:
जगभरातील इतर देशांपेक्षा अमेरिकेत सर्वाधिक बाधित आणि करोना मृत्यू नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेत एक कोटी ६० लाखांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, मृतांची संख्या तीन लाखांवर पोहचली. अमेरिकेचे संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अँथोनी फॉस्सी यांनी सांगितले की, ही संख्या हैराण करणारी आहे. १९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या महासाथीनंतर १०२ वर्षांनी श्वसन यंत्रणेवर परिणाम करणारा महासाथीचा आजार आले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या तीन लाख असली तरी प्रत्यक्षात ही संख्या अधिक असण्याचीही भीती आहे.

वाचा:

अमेरिकेत करोनामुळे मृत होणाऱ्यांमध्ये ६५ व त्या वर्षावरील रुग्णांची संख्या मोठी आहे. मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे. करोनाबाधितांच्या संख्येत पुरुषांपेक्षा महिलांची किंचत अधिक आहे. मात्र, आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या पुरुषांची संख्या अधिक आहे. आयसीयूमध्ये ६१.७ टक्के पुरुषांवर उपचार होतात. तर, ५४.१ टक्के पुरुषांचा मृत्यू होत असल्याचे ‘गार्डियन’ने वृत्तात म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here