म. टा. प्रतिनिधी, : सहकारी जीम ट्रेनर तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात घडली. तसेच या घटनेचे चित्रीकरण करून आरोपीने तरुणीला धमकावले. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत २८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार दीपक चौगुले (रा. पिंपरी-चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील एका जीममध्ये आरोपी चौगुले व पीडित तरुणी हे ट्रेनर म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी आरोपी चौगुले याने रात्री पीडित तरुणीला कॉल केला. त्याला भूक लागली असून जेवणाचा डबा घेऊन बोलावले. तरुणी जेवणाचा डबा घेऊन गेल्यानंतर त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पिण्यास दिले. त्यानंतर तरुणीला गुंगी आली. त्यानंतर आरोपीने तरुणीवर बलात्कार केला.

या घटनेचे चित्रीकरण केले. तरुणीला शुद्ध आल्यानंतर आरोपीने तिला धमकावले. घटनेचा व्हिडिओ काढला असून, घटनेबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणी या घटनेने खूप घाबरली होती. तिने तिच्या मैत्रीणीसोबत याबाबत चर्चा केली. त्यानंतर तिने चंदननगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. चंदननगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here