वॉशिंग्टन: लशीच्या संशोधनाच्या प्रक्रियेविषयी अमेरिकी जनतेचा विश्वास वाढावा, यासाठी सोमवारी जाहीरपणे ही लस घेणार असल्याची घोषणा नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी केली. मॉडर्ना कंपनीने विकसित केलेल्या करोनावरील लशीला अमेरिकेने मान्यता दिली. फायजरपाठोपाठ अमेरिकेने दुसऱ्या लशीला मान्यता दिली असून, करोनाविरोधातील लढ्यातील हा मैलाचा दगड मानण्यात येत आहे.

अमेरिकेत करोना लशीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यातच अनेकांनी लस घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बायडन यांनी केलेल्या घोषणेला मोठे महत्त्व आहे. मॉडर्ना कंपनीच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देणे, हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे, असे बायडेन यांनी नमूद केले. बायडेन म्हणाले, करोनाविरोधातील लढा अद्याप संपलेला नाही आणि खूप मोठी आव्हाने आपल्यासमोर आहे. लशींना मान्यता दिल्यानंतर त्यांचे उत्पादन वाढविणे, वितरण करणे आणि एकाच वेळी लाखो अमेरिकी जनतेचे लसीकरण करणे ही कामे आपल्यासमोर आहेत. दोन लशींच्या वापराला मिळालेल्या मान्यतेवरून, चांगले दिवस येणार याची हमी मिळत आहे. ही लस विकसित करण्यामध्ये, त्याची सुरक्षितता तपासणे यांसारख्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले शास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ आणि चाचण्यांमधील स्वयंसेवक यांच्याविषयी आम्ही आभारी असल्याचे बायडन यांनी म्हटले.

वाचा:

वाचा:

अमेरिकेत काही दिवसांपासून अमेरिकेतील आरोग्य कर्मचारी आणि करोना केअर केंद्रांवर असणाऱ्या नागरिकांना फायजरची लस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. अमेरिकेची औषध कंपनी फायजर आणि जर्मनीची बायोएनटेक यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या लशीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात मान्यता दिली होती. त्यापाठोपाठ आता मॉर्डनाच्या लशीलाही आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून, तेथे आतापर्यंत तीन लाख १० हजारांपेक्षा जास्त जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

वाचा:

जगभरातील इतर देशांपेक्षा अमेरिकेत सर्वाधिक बाधित आणि करोना मृत्यू नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेत एक कोटी ६० लाखांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, मृतांची संख्या तीन लाखांवर पोहचली. अमेरिकेचे संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अँथोनी फॉस्सी यांनी सांगितले की, ही संख्या हैराण करणारी आहे. १९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या महासाथीनंतर १०२ वर्षांनी श्वसन यंत्रणेवर परिणाम करणारा महासाथीचा आजार आले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या तीन लाख असली तरी प्रत्यक्षात ही संख्या अधिक असण्याचीही भीती आहे.

वाचा:
अमेरिकेत करोनामुळे मृत होणाऱ्यांमध्ये ६५ व त्या वर्षावरील रुग्णांची संख्या मोठी आहे. मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे. करोनाबाधितांच्या संख्येत पुरुषांपेक्षा महिलांची किंचत अधिक आहे. मात्र, आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या पुरुषांची संख्या अधिक आहे. आयसीयूमध्ये ६१.७ टक्के पुरुषांवर उपचार होतात. तर, ५४.१ टक्के पुरुषांचा मृत्यू होत असल्याचे ‘गार्डियन’ने वृत्तात म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here