मुंबईः आज राज्यात ३ हजार ८११ नवीन रुग्ण सापडले असून ९८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात यश मिळत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येनं उसळी मारली आहे. नववर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्यानं चिंता वाढली आहे. आजही राज्यात करोनामुक्त रुग्णांपेक्षा करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि अंतर राखण्याचं आवाहन केलं आहे.

आज राज्यात ३ हजार ८११ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, २ हजार ०६४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ८३ हजार ९०५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ९४. ०६ टक्के इतका झाला आहे.

गेल्या २४ तासांत ९८ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यात करोना रुग्णांचा एकूण आकडा ४८ हजार ७४६ इतका झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण मृत्यूदर २. ५७ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६२ हजार ७४३ इतकी झाली असून राज्यातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२१,१९,१९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,९६,५१८ चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत. व सध्या राज्यात ५,०२,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here