मुंबई: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. या पराभवापेक्षा भारतीय संघावर यासाठी अधिक टीका झाली की त्यांनी दुसऱ्या डावात फक्त ३६ धावा केल्या. इतकच नव्हे तर भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. भारताच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीसह अन्य भारतीय खेळाडूंना ट्रोल केले गेले.

वाचा-

भारताच्या या पराभवानंतर महाराष्ट्र टाइम्सने याबाबत एक ऑनलाइन पोल घेतला. चाहत्यांच्या मते भारतीय संघाच्या पराभवाला कोण जबाबदार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या पोल नुसार पहिल्या कसोटीतील पराभवाला संपूर्ण जबाबदार असल्याचे मत ५६ टक्के चाहत्यांनी म्हटले आहे. तर २५ टक्के लोकांच्या मते संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे पराभवाला जबादार आहेत. तर १८ टक्के लोकांच्या मते कर्णधार विराट कोहली या पराभवाला जबाबदार आहे. एक टक्के लोकांनी सांगता येत नाही असा पर्याय निवडला आहे.

वाचा-

वाचा-

पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. त्यांच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवता येईल असे वाटले होते. पण ए़़डिलेड येथे झालेल्या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताचा दुसऱ्या डावात ३६ वर ऑल आउट झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ८ विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

वाचा-

वेबसाइट प्रमाणेच सोशल मीडियावर देखील चाहत्यांनी पराभवासाठी भारतीय संघाला जबाबदार धरले आहे. ट्विटरवरील पोलमध्ये ५३.४ टक्के लोकांनी भारतीय संघ पराभवासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पराभवासाठी २२.१ टक्के चाहत्यांनी विराट कोहलीला तर २०.४ टक्के चाहत्यांनी रवी शास्त्री यांना जबाबदार धरले आहे. ४.१ टक्के चाहत्यांनी सांगता येत नाही असा पर्याय निवडला आहे.

वाचा-

वाचा-

गुलाबी चेंडूसह खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर अश्विन, बुमराह आणि यादव यांच्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १९१ धावात रोखले होते. पहिल्या डावातील ५३ धावांच्या आघाडीसह भारत दुसऱ्या डावात मैदानात उतरला होता. पण भारताला ३६ धावा करता आल्या. ९० धावांचे सोपे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने २ गड्यांच्या बदल्या पार केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here