मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर () ने त्याचा आणखी मित्र करोना व्हायरसमुळे गमावला. एकेकाळी सचिन आणि सोबत क्रिकेट खेळलेले ( ) याचे करोना व्हायरसमुळे निधन झाले. ठाण्यातील एका रुग्णालयात शनिवारी त्यांचे निधन झाले. शिर्के यांचे वय ५७ वर्ष होते. ते एक जलद गोलंदाज होते.

वाचा-

विजय शिर्के यांच्या निधनाआधी ऑक्टोबर महिन्यात सचिनचा जवळचा मित्र अवी कदम यांचे करोना व्हायरसमुळे निधन झाले होते. शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला आणखी एक धक्का बसला आहे. काही वर्षांपूर्वी शिर्के मुंबईतून ठाण्याला राहण्यास आले होते. ठाण्यातील एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले. करोना व्हायरसमधून ते बरे होत होते. पण अचानक त्यांचे निधन झाल्याचे एका जवळच्या मित्राने सांगितले.

वाचा-

वाचा-

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १७ वर्षाखालील उन्हाळी शिबारात ते प्रशिक्षक म्हणून दोन वर्ष कार्यरत होते. विजय शिर्केच्या निधनाने माझे वैयक्तीक नुकसान झाले आहे. हॅरिस शिल्ड स्पर्धेत झालेल्या विक्रमी भागिदारीनंतर आम्ही मफतलाल यांच्याकडून खेळत होतो. आमचा एक चांगला संघ होता आणि संदीप पाटील कर्णधार होते. विजय एक मन मिळावू खेळाडू होता, असे विनोद कांबळीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. नव्या चेंडूने तो फार शानदार गोलंदाजी करायचा. त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची नैसर्गिक शैली होती, अशी आठवण कांबळीने सांगितली.

वाचा-

भारताचा माजी क्रिकेटपटू सलिल अंकोलाने देखील विजय शिर्के यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here