म. टा. प्रतिनिधी, ठाणे: भिवंडीमध्ये गोदामाला आगी लागण्याचे ( ) सत्र सुरूच आहे. रविवारी सायंकाळी दापोडा गाव, वडगावातील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील एफ/५ बी-२ या कापडाच्या गोदामाला लागलेली भीषण आग अद्याप विझली नाही. गोदामाच्या २०० फुटापर्यंतच्या परिसरात ही आग असून तीन अग्निशमन बंबासह एक जंम्बो पाण्याचा टँकर तसेच खाजगी पाण्याचे टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे येथूनही अधिक कुमक मागवण्यात आली आहे. अद्याप या आगीमध्ये कोणीही जखमी नाही. दरम्यान, भिवंडीमध्ये आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असून हे प्रकार थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here