गुजरातमध्ये पोटनिवडणुकीत पक्षाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत गुजरातमधील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असलेल्या कमलनाथ यांच्यावरही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे. कमलनाथ यांनी पक्षातील २३ नाराज आमदारांची पक्षाच्या हायकमांडसोबत चर्चा घडवून त्यांचे मनवळले होते.
कॉंग्रेस हायकमांडने शनिवारी मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीत बदल केले आहेत. जवळपास अडीच वर्षांनंतर भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसची धुरा देण्यात आली आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी यांची जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून एकनाथ गायकवाड यांना हटवण्यात आलं आहे. गायकवाड हे यापुढेही मुंबई काँग्रेसला आपलं मार्गदर्शन करतील, अशी आशा पक्षाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ( maharashtra congress ) ( ) यांच्यावर मात्र काँग्रेस हायकमांडने पुन्हा विश्वास टाकला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात मुंबई कॉंग्रेससाठी छाननी समिती आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखण्याकरता समिती स्थापन करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहेत.
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आसाम आणि केरळसाठी तीन अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटीचे (AICC) सचिव नेमले आहेत. तिथे पुढच्या वर्षाच्या सुरवातीलाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. नवनियुक्त सचिव दोन्ही राज्यांतील प्रभारी सरचिटणीसांना मदत करतील. जितेंद्र सिंह हे आसामचे प्रभारी सरचिटणीस आणि तारिक अन्वर हे केरळचे प्रभारी सरचिटणीस आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times