ही घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पटगोवारी गावात शनिवारी रात्री ७ च्या सुमारास घडली. गणपत शेतमजुरी करायचे तर त्यांची पत्नी गृहिणी आहे. रोहित हा कापसाच्या ट्रकवर काम करायचा. त्याचा मोठा भाऊ वाहनचालक आहे. गणपत यांना दारुचे व्यसन होते. ते नेहमीच दारू पिऊन घरी येत. घरच्यांना तसेच शेजारच्यांना शिवीगाळ करत. कधी कधी ते त्यांच्या पत्नीला बेदम मारहाणसुद्धा करीत. रोहितने अनेकदा आई-वडिलांचे भांडण सोडविले होते. या सगळ्या प्रकाराला चिंचुलकर कुटुंबीय कंटाळले होते. गेल्या महिन्यात रोहितचा अपघात झाला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तेव्हापासून घरीच होता तसेच बेरोजगारही होता. या काळात रोहितची चिडचीड वाढली असल्याचे सांगितले जाते. शनिवारी रात्री परत एकदा शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला. रागाच्या भरात रोहितने गणपत यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. रामटेक पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times