नवी दिल्लीः करोना व्हायरसवरील लसीची ( ) प्रतीक्षा अखेर पुढच्या महिन्यात संपुष्टात येऊ शकते. कोविड -१९ वरील लस भारतातील नागरिकांना जानेवारीपासून दिली जाऊ शकते. सरकारच्या प्राधान्याने लसीची सुरक्षा आणि प्रभाव महत्त्वाचा असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन ( ) यांनी सांगितलं. लस विकासित करण्यात भारतही आघाडीवर आहे, असं हर्षवर्धन म्हणाले.

जानेवारीत भारतातील नागरिकांना कोविड -१९ वरील पहिली लस दिली जाऊ शकते आणि त्यासाठी आपण तयार रहावं. पण हे आपलं वैयक्तीक मत आहे, असं हर्षवर्धन म्हणाले. आपत्कालीन परिस्थितीत ज्यांनी लस वापरासाठी अर्ज केला आहे, अशा सर्व लसींचे नियामकद्वारे विश्लेषण करण्यात येईल. कोविड -१९ लस आणि संशोधनाच्या बाबतीत भारत मागे नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

देशातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ स्वदेशी लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. ३० कोटी नागरिकांना लस देण्याची क्षमता ६ ते ७ महिन्यांत प्राप्त केली जाईल. जीनोम सीक्वेन्सिंग आणि करोना व्हायरसचे अयासोलेशन करून लस बनवली जात आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

देशात सध्या ६ लस वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, झीकोव्ह-डी, स्पुतनिक व्ही, एनव्हीएक्स-कोव्ही 2373 आणि रिकॉम्बिनेंट प्रोटीन अँन्टीजेन आधारित लसचा यात समावेश आहे. या व्यतिरिक्त तीन लस प्री-क्लिनिकल टप्प्यावर आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here