‘अयोध्येचा राजा प्रभू श्री राम यांच्या मंदिरासाठी लोकांनी बलिदान दिलंय. व न्यायालयाच्या आदेशानं मंदिर निर्माण होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालंय. तरीही अयोध्याच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.
‘चार लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार हे लोकांना मान्य नाही. हे चार लाख लोक कोणाच्या प्रचारासाठी पाठवत आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपवावं,’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
‘रामाच्या नावानं बँकेत खातं उघडलं आहे त्यात पुरेसा निधी येतो. शिवसेनेने मंदिरनिर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळय़ात आधी दिला आहे, असं नमूद करतानाच, राजकीय प्रचारासाठी असं करणं हा हजारो कारसेवकांचा अपमान आहे,’ अशी टीकाही केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times