मुंबईः राम मंदिराच्या विषयात शिवसेना आणि संजय राऊत यांना अडथळे आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून कोण प्रवृत्त करत आहे?, असा सवाल नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

अयोध्येतील मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. या अभियानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला आहे. संजय राऊतांच्या या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत आणि शिवसेना या दोघांनाही राम मंदिराच्या कामात अडंग आणण्याची भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे, पायाभरणी कार्यक्रमही ई पद्धतीने घेण्याची मागणी होती, आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छेने येणाऱ्या निधीतून राम मंदिराचं काम होतंय. आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा, या पद्धतीची विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, असं आमचं मत आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

या आंदोलनात ज्यांची केवळ राजकीय घुसखोरी होती त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी झाली होती आणि त्यांनाच आता रामवर्गणी डोळ्यात खूपतेय. मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here