हवाई गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, म्बाबाझी ओलिव्हर जोसलिन असे अटक केलेल्या विदेशी महिलेचे नाव आहे. संशयावरून सीआयएसएफने तिला सुरुवातीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता, तिच्या सँडलच्या सोलमध्ये ५०१ ग्रॅम कोकेन आढळून आले. याची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे.
ड्रग तस्कर महिलेला नंतर सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती सीआयएसएफने दिली. सीआयएसएफने तिला हवाई गुप्तवार्ता विभागाच्या ताब्यात दिले. तिच्याकडे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. चेऊकेवुमेका नावाच्या व्यक्तीने तिला कोकेन दिले होते. दिल्लीतील अन्य तस्कराला ते देण्यासाठी ती मुंबईहून निघाली होती. ही महिला मुंबईतील काही भाग आणि नालासोपाऱ्यात ड्रग तस्करी करत असल्याची माहिती उघड झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times