‘भाजपमध्ये येत्या काळात अनेक जणांचा प्रवेश होणार. काही जण रोज वावड्या उठवतात भाजपचे लोक आमच्याकडे येणार. खरं म्हणजे या वावड्या उठवण्याचे कारण एकमेव आहे. कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. पण त्यांच्या पक्षात इतकी अस्वस्थता आणि नाराजी आहे. की हे आमदार काय करतील ही भीती असल्यामुळं या वावड्या उठवल्या जात आहेत,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर, ‘भविष्यात भाजपमध्ये चांगले लोक येणार आहेत. त्यांना आपण सोबत घेऊन योग्य जबाबदारी देणार आहोत,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘गेल्या काही काळाच विविध पक्षांतून भाजपमध्ये आलेले लोक राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठं राजकारण बघितलं आहे. या देशाचं भविष्य आणि वर्तमान नरेंद्र मोदी हेच आहेत. याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळं धोक्यानं आलेल्या सरकारचं भविष्य कितीकाळ चालणार याबाबतची माहिती सगळ्यांना आहे,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब यांच्या पुन्हा येण्यानं चैतन्य येईल
‘पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपात परतले आहे. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सगळ्या अडचणी दूर करत कुंभमेळा चांगल्या प्रकारे पार पाडला होता. सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. कुणीही वाद करण्याचं कारण नाही. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. नाशिक भाजपाचा बाल्लेकिल्ला झाला आहे. त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे. बाळासाहेब यांच्या येण्यानं पक्षात नवीन चैतन्य येईल,’ अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘नाशिकमध्ये भाजपच्या विकासात काही लोकांचे परिश्रम आहेत. त्यात बाळासाहेब सानप यांचे योगदान मोठे आहे. काही गैरसमजांमुळं आमच्यात अंतर निर्माण झालं होतं. पण, बाळासाहेब यांच्या मनात नेहमी होता. हा माझा पक्ष आहे आणि मला माझं संपू्र्ण आयुष्य इथेच घालवायचं आहे,’ अशी त्यांची भावना आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times